Abhishek Banerjee – शालेय नोकऱ्यांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना उद्या 9 नोव्हेंबर रोजी पुन्हा हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.
त्यानुसार बॅनर्जी गुरुवारी ईडीसमोर हजर होतील, असे पश्चिम बंगालच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आणि टीएमसीच्या प्रवक्त्या शशी पांजा यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांना त्रास देण्यासाठी भाजप अशा सूडाचे राजकारण हाती घेतले असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचे राज्य प्रवक्ते शमिक लाहिरी यांनी हा आरोप फेटाळून लावला.
आमचा पक्ष सूडाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. त्यांनी सांगितले की केंद्रीय एजन्सीद्वारे समन्स बजावणे न्यायालयाच्या देखरेखीखाली होत आहे आणि जर टीएमसीला काही समस्या असेल तर ते न्यायालयात जाऊ शकतात असे ते म्हणाले.
या आधी ईडीने अभिषेक बॅनर्जी यांची 13 सप्टेंबर रोजी शिक्षक भरती घोटाळ्यात सुमारे नऊ तास चौकशी केली होती, तेव्हा त्यांनी दावा केला होता की ही चौकशी त्यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होता. यापुर्वी कोळसा चोरी प्रकरणात दोन वेळा त्यांची ईडीने चौकशी केली होती.