sex racket – नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका 17 वर्षीय तरुणीकडून चालवल्या जाणाऱ्या देह व्यापाराच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून पोलिसांनी तेथून चार महिलांची सुटका केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून हा प्रकार उघडकीला आणला. वाशीतल्या एका हॉटेलात हा व्यवसाय सुरू होता. हॉटेलवर छापा टाकल्यानंतर पकडलेल्या चारही जणी 20 वर्षांच्या असून त्यात नेपाळमधील एक आणि बिहारमधील दोन महिलांचा समावेश आहे.
त्यांना पुनर्वसन गृहात पाठवण्यात आले आहे. त्यांच्याकडून दीड लाख रूपये किंमतीच्या काही बनावट नोटाहीं जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांवर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र या रॅकेटची सूत्रधार एक अल्पवयीन मुलगीच असल्याचे समजल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले होते.