भाजपचे स्टार प्रचारक आज इंदापुरात

रेडा – इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपचे स्टार प्रचारक सोमवारी (दि. 14) इंदापुरात येणार असल्याने सोमवारी इंदापूर तालुका भाजपमय होणार असल्याचे भाजपचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्या व केंद्रीय महिला,बालकल्याण विकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन या दोन मंत्र्यांची सभा सोमवारी (दि. 14)निमगाव केतकी येथील बाजारतळ पटांगणावर दुपारी 1 वाजता होणार आहे, अशी माहिती महायुतीचे प्रचार प्रमुख ऍड. कृष्णाजी यादव यांनी दिली.

या सभेला माणचे आमदार जयकुमार गोरे, प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष व हडपसरचे आमदार योगेश टिळेकर हे उपस्थित राहणार आहेत. तरी सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ऍड. यादव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.