पवनानगर – येथील संकल्प इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी प्रभात फेरी काढत पथनाट्य सादर करत मतदान जनजागृती अभियान राबवले. लोकसभेची निवडणूक निवड जाहीर झाली. मतदान हा संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे, तो सर्वांनी बजवला पाहिजे व ते आपले कर्तव्य आहे.
याकरिता अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पवनानगर चौकात प्रभात फेरी काढत पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.
पथनाट्य आणि प्रभात फेरी यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षक निता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, श्वेता कालेकर, संध्या शिंदे, ऐश्वर्या बुटाला, काजल कालेकर, आकाश भालेराव, दिनेश परचंड यांच्यासह शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी यांनी विशेष
परिश्रम घेतले.