मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि घटक पक्ष यांच्यामध्ये जागावाटपाविषयी चर्चा चालू आहे. विधानसभेसाठी भाजपने १६०पेक्षा अधिक जागांवर दावा केला आहे. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौरा करणार आहेत.
सूत्रानुसार, भाजपने शिवसेनेला जागा वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे. यामध्ये १६० पेक्षा अधिक जागा भाजप, ११० शिवसेना आणि घटक पक्षांसाठी १८ जागा लढवण्याची शक्यता आहे. परंतु, शिवसेनेने ११० पेक्षा कमी जागा लढविण्यास नकार दिला आहे. मात्र, घटक पक्षांना १८ जागा देण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीची एकूण २८८ जागा आहेत. जागा वाटपांसाठी दोन्ही पक्षांची चर्चा सुरु असून भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपासाठीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.