मुंबई – नायर हॉस्पिटलमध्ये उपचाराअभावी 4 महिन्यांच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणावरून मुंबई महापालिकेच्या सभागृहात शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. दोन्ही पक्षाचे नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.
नायर हॉस्पिटलमध्ये उपचाराअभावी 4 महिन्यांच्या बाळाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. हे बाळ त्याच्या परिवारासहित वरळीतील सिलेंडर ब्लास्ट घटनेत जखमी झाले होते. यावरुन भाजप नगरसेवकांनी आरोग्य समितीचा राजीनामा दिला. यावर सेनेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवांनी भाजपचे लोकं राजीनामा देतात. आम्ही सेनेचे मात्र लढतो, असे वक्तव्य केले.
यावरुन भाजप नगरसेवक चिडले आणि सेना-भाजपचे नगरसेवक आमनेसामने आले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाही भाजप नगरसेवकांनी घेरले.