बारामती: बारामतीत राबवलेल्या ‘बारामती पॅटर्नची’ पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला बारामती पॅटर्नचा सुरू असलेला भोंगळ कारभाराबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बारामती शहर पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले. यात तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे आणि शहर अध्यक्ष सतीश फाळके या दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बारामतीत करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती पॅटर्न नुसार सुरू असलेले प्रशासनाचे काम भोंगळ पध्दतीने सुरू असल्याचा आरोप बारामती भाजप पदाधिकारी यांच्या कडून करण्यात येत आहे.
यात केंद्राकडून आलेले धान्य योग्य रित्या वाटप होत नाही, शेतकऱ्यांकडून कमी भावात भाजीपाला घेऊन चढ्या भावात त्याची विक्री नागरिकांना केली जात आहे, गोरगरीब जनतेसाठी सुरू असलेली शिवभोजन थाळीमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न देणे, अश्या प्रकारच्या आरोपाचे निवेदन बारामतीत पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला देण्यासाठी दोन भाजप पदाधिकारी गेले होते.
दरम्यान, भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना शहर पोलिसांनी 144 कलम नुसार सुरू असलेल्या संचारबंदी आहे तुम्हाला निवेदन देत येणार नाही. असे म्हणत त्यांना पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. नंतर त्यांना 68 कलमा नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.