लस येईपर्यंत लॉकडाउन सुरूच राहणार – बिप्लब देब

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशात २५ मार्च पासून लॉकडाऊन सुरु आहे.  लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मी राजी संपणार आहे. मात्र कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहत देशात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील एका राज्याने हे स्पष्ट केले की लॉकडाऊन अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत.

त्रिपुरा सरकाने राज्यात लॉकडाऊन  उघडणार नसल्यचे म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी स्पष्ट केले आहे कि जजोपर्यंत कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत राज्यात लॉकडाऊन हटवणार नसल्याचं त्यांनी स्प्ष्ट केलं. गुरुवारी ४ तास चाललेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं.

राज्यात जोपर्यंत कोरोना वरील लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन कडक राहणार असल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यात लॉकडाऊनमध्ये काही विभागात शिथिलता देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील जनतेला बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्रिपुराच्या सर्व राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत राज्यातील सुमारे 18 पक्षांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला.

दरम्यान,  ब्रिटन, यूएसए आणि चीन सारखे देश सातत्याने दावा करीत आहेत की त्यांनी लसीची चाचणी सुरू केली आहे. मात्र कोरोनावरील लक्ष वर्षाच्या अखेरीस बाजारात येण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.