अहमदाबाद – गुजरातमध्ये नरोदामधील भाजपा आमदार बलराम थवानी यांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असे जखमी महिलेचे नाव असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर्ड प्रमुख आहेत. बलराम थवानी आणि त्यांचे समर्थक महिलेला मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
#WATCH BJP's Naroda MLA Balram Thawani kicks NCP leader (Kuber Nagar Ward) Nitu Tejwani when she went to his office to meet him over a local issue yesterday. Nitu Tejwani has registered a complaint against the MLA. #Gujarat pic.twitter.com/dNH2Fgo5Vw
— ANI (@ANI) June 3, 2019
पाणी टंचाईची तक्रार करण्यासाठी नीतू तेजवानी त्या भागातील नागरिकांसोबत बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. आपल्यावर पहिल्यांदा हात उचलण्यात आला. स्वत:च्या बचावासाठी मी महिलेवर हात उचलला असे बलराम थवानी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बलराम थवानी यांनी घटनेबद्दल खेद व्यक्त करताना महिलेची माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे.