नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाब घालण्यावर बंदीच्या प्रकरणाने देशात रान उठले आहे. यामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे. दरम्यान, आता या सर्व घडामोडीत आता कर्नाटक भाजपच्या आरोपामुळे हे प्रकरण आणखी चिघळले आहे. कर्नाटकमध्ये अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली असून, त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. यामुळे शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने मंगळवारी घेतला.
उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे. त्यानंतर आता हा वादाचे पडसाद देशभरात उमटले असून यावरुन राजकारण सुरु झाले आहे. एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विद्यार्थिनींना पाठिंबा दिला आहे. तर महिलांना हवे ते परिधान करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे, असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
ನಾವು ಹೇಳುತ್ತಿದ್ದದ್ದು ಇದನ್ನೇ. ಹಿಜಾಬ್ ವಿವಾದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೃಷ್ಟಿ.
ಹಿಜಾಬ್ ಪರ ಹೈಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ವಾದ ಮಾಡುತ್ತಿರುವುದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾನೂನು ಘಟಕದ ಪ್ರತಿನಿಧಿ.
ಸಮಾಜ ಒಡೆಯುವ ಕೆಲಸವನ್ನು @INCKarnataka ಎಷ್ಟು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಡೆಸುತ್ತಿದೆ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಬೇರೆ ಉದಾಹರಣೆ ಬೇಕೇ?#CongressVoteBankPolitics pic.twitter.com/wZ2ARvYbIj
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) February 8, 2022
दरम्यान, विद्यार्थिनींना हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी त्यांच्या एका याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालय विचार करत आहे.
“हिजाब वादाच्या जन्मामागे काँग्रेस आहे. उच्च न्यायालयात हिजाबच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकील काँग्रेसचे कायदेशीर प्रतिनिधी आहेत. काँग्रेस यासाठी काम करत आहे हे सांगण्यासाठी आम्हाला आणखी एक उदाहरण हवे आहे का?, असा सवाल भाजपा कर्नाटकने केला आहे.