भाजपा खऱ्या अर्थाने ‘पार्टी विथ डिफरन्स’; जयंत पाटलांची टीका

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ट्वीटरच्या माध्यमातून टीका

मुंबई: नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. पण भाजपाने त्यांच्या प्रवेशानंतर लगेचच खरे रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यामध्ये रविवारी एक जाहीर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नाईक यांना स्थानच दिले गेले नाही. त्यामुळे अपमानित झालेल्या नाईक यांनी मग कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला.

गणेश नाईक यांना मिळालेल्या या वागणुकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षजयंत पाटील यांनी ट्वीटरद्वारे सहानुभूती व्यक्त केली आहे. ‘व्यासपीठावर जागा न मिळाल्याने गणेश नाईक यांना कार्यक्रमातून जाताना पाहून दुःख वाटले. गणेश नाईक यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला व्यासपीठावर जागा न देणारी भाजपा ही ख-या अर्थाने ‘पार्टी विद डिफरन्स’ आहे.’ अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here