राज्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी महत्वपूर्ण नियोजन करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती

कराड: सध्या महाराष्ट्रात विक्रमी पाऊस पडत आहे. त्याचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. वर्ल्ड बँकेने असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. ज्यामुळे पूरनियंत्रण करता येते, त्यादृष्टीने वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेची मल्टीएक्सपर्टची 22 लोकांची टीम महाराष्ट्रात गेली आहे. त्यांच्यापुढे आम्ही प्रपोजल मांडले होते. त्यानंतर डिजास्टर प्रूफ इन्फ्रास्ट्रक्चर कसे तयार करता येईल हे करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांनी बोलताना त्यांच्या वक्तव्याचा फायदा भारताला होईल की पाकिस्तानला होईल यांचा विचार करणे गरजेचे आहे. राहूल गांधी यांनी जम्मू-काश्मिरमध्ये असेच काही वक्तव्य केल्यानंतर पाकिस्तानने युनायटेड नेशन्समध्ये भारतीय नेते आमच्यासोबत असल्याचे सांगितले होते. निवडणुका येणार-जाणार परंतु मते मिळवण्यासाठी अशी देश विरोधी वक्तव्ये करणे चांगले नाही. भारतीय मुलमान हा देशाविषयी अभिमान राखणारा आहे. पवारांनी पाकिस्तानचे कौतुक केले, म्हणून मुस्लिम लोक त्यांना मते देतील, असा विचार करणारा राष्ट्रवादी पक्ष कोणत्या मानसिकतेत आहेत, हे समजते. अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)