आपल्यावर अन्याय होतोय हे आधी कळल नाही का?

नाशिक – आपल्यावर अन्याय होतोय, हे उदयनराजेंना आधी कळल नाही का ? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये उपस्थित केला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. “आपल्यावर अन्याय होतो आहे हे उदयनराजेंना आधी कळल नाही का ? त्यांना ही समज यायला १५ वर्षे लागली” अशी टीका शरद पवारांनी उदयनराजेंवर केली आहे.

दरम्यान शरद पवार नाशिकमध्ये आणि छगन भुजबळ मुंबईत होते. त्यावरही काही उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र त्यावर प्रश्न विचारला असता, “आजचा कार्यक्रम छगन भुजबळ यांनीच आखून दिला” असे उत्तर शरद पवार यांनी दिले. येत्या आठवड्यात निवडणूक जाहीर होईल, दिवाळीच्या आत राज्यात निवडणूक होईल” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस १२५, राष्ट्रवादी काँग्रेस १२५ जागांवर लढणार आहे तसेच मित्र पक्षांना ३८ जागा देण्यात येणार आहेत. हा फॉर्म्युला ठरल्याचेही त्यांनी सांगितलं.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.