कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महाआघाडीने आपला झेंडा फडकवला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला धक्का देत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. बजरंग ज्ञानू पाटील यांची अध्यक्षपदी तर सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
बजरंग पाटील यांना ४१ मते मिळाली तर भाजपच्या अरुण इंगवले यांना २४ मते मिळाली. तर उपाध्यक्षपदी सतीश पाटील यांनी ४१ मते मिळवत भाजप राहुल आवाडे यांचा २४ मतांनी पराभव केला.
पीठासन अधिकारी वैभव नावडकर सभेला सुरुवात केली. त्यांनी अर्जदारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दहा मिनिटाची वेळ दिली मात्र कोणीही अर्ज मागे न घेतल्याने त्यांनी मतदान प्रक्रियेला सुरवात केली.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग पाटील यांना ४१ मते मिळाली तर भाजपचे अरुण इंगवले यांना २४ मते मिळाली. बजरंग पाटील १७ मतांनी विजयी झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी वैभव नावडकर यांनी केली.