भाजप माजी आमदाराचा पब्लिसिटीसाठी अजब फंडा; ऑक्सिजन सिलेंडरवर लावले स्वत:चे फोटो

सुरत – गुजरातमधील व्यापाराचे मुख्य केंद्र असलेल्या सुरतमध्ये करोनाच्या प्रकोपामुळे हाहाकार उडाला आहे. याठिकाणी रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास अंत्यसंस्कार सुरु आहेत. ही बातमी ताजी असतांनाच भाजपा नेते स्वत:ची लोकप्रियता वाढवण्यावर भर देत असल्याची बातमी समोर येत आहे.


मिळलेल्या माहितीनुसार, गुजरात येथे करोनाचा तांडव सुरु असतांना अमरेली भाजपाचे माजी आमदार हिरा सोलंकी यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनं २५ बेड्सचे कोविड सेंटर उभारले. त्यात जिल्हा रुग्णालयाकडून पाठवलेले रुग्णांचे उपचार केले जातात. मात्र  यांनी ऑक्सिजन सिलेंडरवर स्वत:चा फोटो लावून त्याचा पुरवठा सुरू केला आहे. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोशलवर सध्या या फोटोवरून भाजप पक्षावर टीका केली जात आहे.

सोशल मीडियावरील  व्हायरल फोटोमध्ये  हिरा सोलंकी यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्याच्या लोकप्रियतेसाठी ऑक्सिजन सिलेंडरवर त्यांचे पोस्टर्स छापले आहेत. ऑक्सिजन सिलेंडरवर त्यांचे पोस्टर्स छापल्यामुळे सोशलवर नेटकऱ्यानी पब्लिसिटी साठी ऑक्सिजन सिलेंडरवर फोटो छापणे नेत्यांना शोभत नाही असं लोकं म्हणत गुजरात मॉडेलची सुद्धा खिल्ली उडवली जात आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.