सावधान! तुम्हालाही आलीये ‘व्हॉट्‌स अॅप पिंक’ची लिंक, तर एकदा ही बातमी वाचाच

पुणे – अलीकडे “व्हॉट्‌स ऍप पिंक’बाबत एक संदेश अनेक ग्रुपवर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हॉट्‌स ऍपचा अधिकृत संदेश नसून, सायबर हल्लेखोरांकडून पसरवला जाणारा मालवेअर असल्याचे समोर आले आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी या संदेशाबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून “व्हॉट्‌स ऍप पिंक’ हे अधिकृत अपडेट असून, दिलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यास नवीन वैशिष्ट्यांसह तुमच्या व्हॉट्‌स ऍप आयकॉनचा रंग गुलाबी होईल,’ असा संदेश अनेक ग्रुपवर फिरत आहे. या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर सांगितल्याप्रमाणे कोणतीही प्रक्रिया घडत नाही. मात्र, ती लिंक आपोआप इतर चार जणांना पाठवली जाते, असा अनुभव अनेक वापरकर्त्यांनी शेअर केला आहे.

याबाबत सावध राहण्याचा इशारा देत, सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी या लिंकचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते, सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ऍप असणारे व्हॉट्‌स अप हे नेहमीच सायबर हल्ले करणाऱ्यांचे मुख्य टार्गेट असते. वापरकर्त्यांचे नुकसान करण्यासाठी नेहमीच काही न काही प्रयोग हे हल्लेखोर करत असतात.

पिंक ऍप हा त्याचाच एक भाग आहे. हे एक प्रकारचे मालवेअर असून, लिंकच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलमधील माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे त्यापासून सर्वांनी सावधानता बाळगली पाहिजे.’

तुम्हाला काय करावे लागेल?
व्हॉट्‌स ऍप पिंक ऍप वायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वप्रथम हे पिंक ऍप अनइन्स्टॉल करावे आणि मोबाइलच्या “ऍप परमिशन’मध्ये जाऊन अनावश्‍यक परवानगी रद्द करावी, असेही सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सुचवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.