पाकिस्तानातील कलाकारांनी सोशल मीडियावर एक नवीन हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकार रॉयल्टीची मागणी करायला लागले आहेत. टीव्ही ऍक्ट्रेस नाईला आफरी हिने आपल्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी टीव्ही सिरीयलच्या रिपीट टेलिकास्ट मधून मिळणाऱ्या पैशांची मागणी केली आहे.
त्यानंतर पाकिस्तानातील माहिरा खान, नासिर हुसेन, मंशा पाशा, झारा नूर अब्बास, आर्मीना खान, कुबरा खान, असद सिद्दिकी यांच्यासारख्या अन्य कलाकारांनीही रॉयल्टीची मागणी केली आहे. प्रत्येक एक इंडस्ट्रीचे काही नियम असतात. हे नियम एंटरटेनमेंट इंडस्ट्रीलाही लागू व्हायला हवेत. त्यासाठी ही मोहीम सुरु केल्याचे झारा नूर अब्बासने सोशल मीडियावर म्हटले आहे.
पाकिस्तानी कलाकारांच्या या मोहिमेला प्रेक्षकांनीही पाठिंबा द्यावा, अशी मागणी या कलाकारांनी केली आहे. बॉलिवूडमध्ये देखील पूर्वी अशी मागणी केली गेली होती. जावेद अख्तर, स्वानंद किरकिरे, वरूण ग्रोवर यासारख्या कलाकारांनी अशी मागणी केली होती.