पंकज मुंडेंच्या ट्विटरवरून भाजप गायब; पक्षांतर करणार?

मुंबई – राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघात पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा यांचे बंधु धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना विधानसभा निवडणुकीत धुळ चरत विजय मिळवला आहे. हा पराभव पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला होता. अशातच भाजपची साथ सोडण्याचे संकेत पंकजा यांनी दिले आहेत.

पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भाजप हा शब्द काढून टाकला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असे होते. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहले आहे.

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भविष्यातील मार्गक्रमणासंदर्भात “फेसबुक’वर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टमधून भाजपला त्या अडचणीत आणण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसते आहे. आपल्या भविष्यातील रणनितीसंदर्भातील घोषणा 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावरून केली जाईल, असेही पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे पंकजा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.