फुलवालीवर मलायका भडकली

बॉलिवूड सेलिब्रिटीज नेहमी आपल्या फॅन्सना ऑटोग्राफ देत असतात. त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी रांगाही लागलेल्या असतात. या प्रेमाच्याच आधारे ते स्टार होत असतात, हे त्यांनाही माहिते असते. पण या फॅन्सच्या प्रेमाचा काही वेळेस या सेलिब्रिटीजना त्रासही होतो.

अशाच एका फुले विकणऱ्या महिलेचा त्रास मालायका अरोराला झाला. तिच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते राग स्पष्ट दिसत होता. एकदा जिममधून बाहेर पडल्यावर या फुलवालीने मलायकाला पकडले आणि गजरा विकत घेण्याची गळ घातली.

मलायकाने नकार दिल्यावरही ही फुलवाली वारंवार गजरा पुढे करत होती. याचा मलायकाला राग आला. पण तिने आपल्या चेहऱ्यावर राग दिसू नये, याचा आटोकाट प्रयत्न केला. पण तिच्या चेहऱ्यावरचा राग लपून रहिला नाही. यावेळी मलायकाच्या बरोबर अमृता अरोरा, सीमा खान, अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलापण होत्या.

मलायका आपल्या फॅन्सशी कधी असे फटकून वागत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. काही दिवसांपूर्वी एका वयस्कर व्यक्‍तीने मलायकाला सेल्फीचे विनंती केल्यावर रस्त्यावर उभे राहूनच तिने त्यांना सेल्फी घेऊ दिले होते. मग असे काय झाले की साध्या फुलवालीच्या गजरा घेण्याच्या विनंतीवर मलायका भडकली ?

 

Leave A Reply

Your email address will not be published.