Bjp : देशात काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्व पक्ष जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. त्यातच आता भाजपने देखील आपली तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी सुरु असून पक्षाकडून निवडणूक प्रमुखांना दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या २१ आणि २२ नोव्हेंबर ला उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुका समीप आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने यापूर्वीच मिशन ४५ च्या वर जागा जिंकण्याचे आखले आहे.
तर राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचा प्रश्न तसेच ओबीसी समाजाचा विरोध ही सर्व परिस्थिती पाहता आगामी निवडणुकांसाठी भाजप कोणती रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.