हेग – नेदरलॅन्डमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार व्हायला लागला असल्याची लक्षणे दिसायला लागली आहेत. एका शेतातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असल्याने तब्बल दिड लाख कोंबड्या मारुन टाकण्यात येणार आहेत, असे नेदरलॅन्डच्या कृषी मंत्र्यांनी म्हटले आहे.
बर्ड फ्लूची लागण झालेल्या कुक्कुट पालन उद्योगाच्या जवळपास अन्य कोणताही पशू उद्योग नाही, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. संसर्ग आढळलेल्या पोल्ट्रीच्या 10 किलोमीटरच्या परिघामध्ये पोल्ट्रीतील कोणतीही उत्पादने, अंडी किंवा पोल्ट्रीतील टाकाऊ पदार्थांची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गेल्यावर्षी जानेवारीमध्ये नेदरलॅन्डमध्ये बर्ड फ्लूची साथ पसरायला लागली होती. त्यामुळे हजारो कोंबड्या, बदके आणि शेकडो वन्यपक्षी मारुन टाकण्यात आले आहेत.