नवी दिल्ली – देशाचे पहिले संरक्षण दलप्रमुख दिवंगत बिपीन रावत यांचे बंधू निवृत्त कर्नल विजय रावत यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या उपस्थितीत रावत यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. भाजप प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली.
अनोखी दूरदृष्टी असणाऱ्या मोदींचे संपूर्ण कार्य देशाच्या कल्याणासाठी आहे, असे ते म्हणाले. आता रावत यांच्या रूपाने भाजपला एक प्रभावी उमेदवार मिळाल्याचे मानले जात आहे. उत्तराखंडची सत्ता राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. त्या पक्षापुढे कॉंग्रेसने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.