मुंबई – नुकतच भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 12 जणांचं हॅलिकॉप्टर अपघातात निधन झालं होतं. त्यामुळे देशभरातून सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीही बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते आपण कोणाबद्दल बोलतोय हेच विसरले होते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. यावर आता सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सदावर्ते यांनी बिपीन रावत यांना श्रद्धांजली देताना आपण गोंधळलो नसल्याचं म्हटलं. आपण आयोजित केलेली श्रद्धांजली सभा केवळ देशातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिली सभा होती. घटना घडून काही क्षणच झाले होते. मी पेशाने वकील आहे. आपली चूक होऊ नये, म्हणून खात्री करून मी बोललो. परिपूर्ण माहिती घेऊन बोलण्यात गैर काहीही नाही.
तुमच्या टीआरपीसाठी मी गोंधळल्याचं बोलल जातं, असंही सदावर्ते यांनी नमूद केलं.
अनेकदा बऱ्याच गोष्टी अर्धसत्य होतात. घटना घडून काहीच वेळ झाला होता. मी शहिद झालेल्या सर्वांची माहिती घेतली होती. केवळ मला ट्रोल कऱण्यासाठी कटछाट कऱण्यात आली. माझं संपूर्ण वक्तव्य दाखविण्यात आलं नसल्याचं सदावर्ते यांनी नमूद केलं.
सध्या एक पद्धत आली आहे. गुणरत्नेंवर टीका केली की आपण चर्चेत येतो, हे सर्वांना ठावूक आहे. माझ्यावर टीका केल्याने लोक मोठे होतात. त्यांना होऊद्या मोठं असं सदावर्ते यांनी म्हटलं.