नवी दिल्ली : जगप्रसिद्ध असणाऱ्या टाइम मॅगझिनने जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. त्याच बरोबर यादीत अभिनेता आयुष्मान खुराणा याचाही समावेश आहे. परंतु, या सर्वांमध्ये सर्वात आश्चर्याचे नाव या यादीत समाविष्ट झाले ते म्हणजे शाहिनबाग प्रकरणाचा चेहरा बनलेल्या ८२ वर्षांच्या बिल्किस बानो यांचे. टाइम मॅगझिनने बिल्किस बानो यांना जगातील प्रभावशाली शंभर जणांच्या यादीत स्थान दिले आहे.
राष्ट्रीय नागरिकत्व कायद्यासाठी देशात करण्यात आलेल्या शाहिनबाग आंदोलनाचा बिल्किस बानो या चेहरा बनल्या होत्या. बानो यांनी या वयात केलेल्या कामामुळे त्यांचा टाइम मॅगझिनमध्ये समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. बिल्किस बानो या नागरिकत्व कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी शाहीनबागमध्ये 101 दिवस धरणे आंदोलनात सहभागी होत्या. जगातील शंभर व्यक्तीच्या यादीत बिल्किस बानो यांचे नाव घेऊन टाइम मॅगझिनकडून त्यांच्या जिद्दीला सलाम केला असल्याचे दिसत आहे.