मोठी बातमी !अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

गृह मंत्रालयाकडून कोणताही दुजोरा नाही

मुंबई : रिलायन्स समूहाचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या संस्थेने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. मात्र गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, कदाचित एखादी दहशतवादी संस्था चर्चेत येण्यासाठी हे करत असेल. आतापर्यंत तपासात असा कोणताही पुरावा याबाबत सापडलेला नाही.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्या प्रकरणी एखादी दहशतवादी संघटना जबाबदारी घेते ते प्रसिद्ध होण्यासाठी करत आहे. दिल्लीतील दूतावासाबाहेर स्फोट प्रकरणातही असा दावा केला गेला होता. परंतु आतापर्यंत तपासात कोणताही पुरावा सापडला नाही. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणातील चौकशीतही कोणताच पुरवा सापडलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करणारे लोक कोण होते, याचा तपास मुंबई पोलीस घेत आहेत. मात्र पोलीस तपासात अद्याप कोणताही असा पुरावा सापडला नाही की तपास पुढे सरकू शकेल. पोलिसांना या कटात वापरल्या गेलेल्या इनोव्हा कारचे फुटेज सापडले असून आरोपी टोल नाक्यांवरून मुंबईबाहेर गेले असल्याचे यातून दिसत आहे.

शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात जिलेटिनच्या काड्यांनी सुसज्ज स्कॉर्पिओ कार सापडली होती. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा बंगला अँटिलियापासून अवघ्या 600 मीटर अंतरावर ही कार पार्क केली होती.

मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं आणि धमकीचे पत्र आढळून आल्याने खळबळ उडाली. चिठ्ठीत लिहिले की, “नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या.” घटनास्थळी सापडलेली स्कॉर्पियो कार ही काही दिवसांपूर्वीच चोरीला गेली होती. याबाबत पोलिसातही तक्रार करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.