मुंबई- बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ (Sonu Sood) हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली.
दरम्यान, आता हाच रिअल लाईफ हिरो मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण अभिनेता सोनू सूद विरोधात जुहू पोलीस ठाण्यात मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनू सूद (Sonu Sood) याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आल्यामुळे ही नोटीस देण्यात आली आहे.
Maharashtra: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has filed a police complaint against actor Sonu Sood (in file photo) for allegedly converting a six-storey residential building in Juhu into a hotel without BMC’s permission. pic.twitter.com/49FU1Y3iGJ
— ANI (@ANI) January 7, 2021
पालिकेने (BMC) सोनू सूद विरोधात 4 जानेवारील तक्रार दाखल केली होती. बांधकामाबाबत नोटीस देऊन सुद्धा सोनू सूदने बांधकाम सुरूच ठेवले त्यामुळे पालिकेने पोलिसात तक्रार केली आहे. दरम्यान, पालिकेच्या या कारवाईला सोनू सूद (Sonu Sood) कशा प्रकारे सामोरा जाईल याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. कोरोना काळात सोनू अनेकांसाठी देव दूत ठरला होता.