नवी दिल्ली – रशियाचे चांद्रयान लुना-25 हे चंद्राच्या अखेरच्या कक्षात प्रवेश करताना चंद्रावर कोसळल्याने रशियाची चांद्रमोहिम सध्या तरी अपयशी ठरली आहे. रशियन स्पेस एजन्सी रोस्कॉसमॉसने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, कालच लुना-25 या अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाला होता.
रोस्कॉसमॉसने एक दिवसापूर्वी सांगितले होते की लॅंडिंग करण्यापूर्वी कक्षा बदलताना एक असामान्य परिस्थिती उद्भवली, ज्यामुळे लुना-25 कक्षा योग्यरित्या बदलू शकले नाही. अंतराळ मोहिम तज्ञ सध्या अचानक आलेल्या समस्येचा सामना करण्यास असमर्थ आहेत. त्यावर ते सातत्याने काम करत आहेत.
याआधी, रशियन एजन्सीने सांगितले होते की लूना 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. मात्र, आता ते शक्य असणार नाही.
रोस्कॉसमॉसने अहवाल दिला होता की लुना-25 ने चंद्राच्या जमिनीवरील खड्ड्यांची छायाचित्रे पोस्ट केली होती.
हे चंद्राच्या दक्षिण गोलार्धातील तिसरे सर्वात खोल विवर आहे, ज्याचा व्यास 190 किमी आहे आणि त्याची खोली 8 किमी आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की लुना-25 वरून आतापर्यंत मिळालेल्या डेटावरून चंद्राच्या मातीतील रासायनिक घटकांबद्दल माहिती मिळाली आहे.