मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात ती अभिनेता शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर दीपिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती संतापलेली दिसते. दीपिका पादुकोण हिचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ साधारण एक महिन्यापूर्वींचा आहे. मात्र, आता तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मनीष मल्होत्रा याच्या फॅशन शोमधील असल्याचे सांगितले जात आहे.
अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्टने एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह याची आई पोहचली होती. या व्हिडीओमध्ये पापाराझी यांच्यावर दीपिका पादुकोण ही भडकताना दिसली. त्याचे झाले असे की, पापाराझी दीपिकाला फोटोसाठी थांबण्याची विनंती करत होते. मात्र, यावेळी दीपिका पादुकोण ही संतापली आणि म्हणाली की, “हे बॅक स्टेज आहे आणि तिथे येण्यास परवानगी नाही.”
View this post on Instagram
तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिच्यावर संताप व्यक्त करत आहे. तिचे हे बोलणे अजिबातच आवडले नसल्याचे अनेकांनी म्हंटले आहे.