Sambhajiraje : गेल्या पाच दिवसांपासून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहे. याबाबत ते गेले कुठे याबाबत कुटुंबालाही माहिती नाहीये. नुकतेच कोल्हापुरातील विकासकामांचं उद्घाटन तीन फेब्रुवारीला संभाजीराजे यांच्या हस्ते होणार होते.
काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व ! 🙏
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 2, 2024
मात्र यापूर्वी दोन फेब्रुवारीला एक ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. या ट्विटमध्ये लिहिण्यात आले होते की,’ काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे रद्द करण्यात आलेले आहेत. क्षमस्व!, या ट्विटनंतर संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहेत.
दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संभाजीराजे चाचपणी करत आहे. ते सतत दौरे करत आहेत. संभाजीराजे या मतदारसंघातून तयारी करत आहे. अशातच महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा होते आहे. शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापूर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे हे नॉटरिचेबल आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्या भूमिकेवरून चर्चाना उधाण आले आहे. संभाजीराजे यांच्या राजकीय भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा होत आहे.