पुणे – एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पाच पथके तयार केली गेली आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार, दर्शना हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मुंबई येथून राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. दर्शनाच्या हत्येचं कारण आता समोर आले आहे.
वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहिती नुसार, दर्शना आणि राहूल गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र परीक्षेपूर्वी राहुलनेच ब्रेकअप केलं होतं. मात्र दर्शना अधिकारी झाल्यावर राहुल पुन्हा लग्नासाठी मागे लागला होता. त्यांनी वर्षभरापूर्वी एम पी एस सी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली होती. मात्र या प्रयत्नांमध्ये दर्शनाला आधी यश आले आणि तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती.
दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहूल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एम पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा आणि तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल असे दर्शना आणि तिच्या कुटुंबीयांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहूलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.
दरम्यान, तिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या सतीचा माळ परिसरात सापडल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी तिचा मित्र संशयाच्या भोवऱ्यात असून तो गडावरुन खाली एकटाच आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले आहे.
एमपीएससी परीक्षेत दर्शना दत्ता पवार (रा. कोपरगाव, जि. नगर) उत्तीर्ण झाली होती. वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून एमपीएससी परीक्षेत ती राज्यातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित केला होता. 9 जून रोजी ती पुण्यात आली होती. 12 जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे नऱ्हेतील मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. तिने कुटुंबीयांना ही माहिती दिली होती. तिच्यासोबत राहुल होता. 12 जूननंतर तिचा मोबाइल क्रमांक बंद झाला.
तिच्या कुटुंबीयांनी तिचा मोबाइल बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना. मात्र, ठावठिकाणा लागला नाही. तिच्या कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, दर्शनाबरोबर असलेला मित्र राहुल हा बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलीस ठाण्यात दिली होती. रविवारी राजगडच्या पायथ्याशी तिचा मृतदेह सापडला.
दर्शना आणि तिचा मित्र राहुल हांडोरे हे दुचाकीवरुन वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघेजण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारस राहुल हा गडावरुन एकटाच खाली आला. पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून माहिती उपलब्ध झाली आहे. राहुल पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांना दर्शनाच्या शवविच्छेदन अहवाल मिळाला नसून, शवविच्छेदन अहवालातून तिच्या मृत्यूमागचे कारण समजेल.
भांडण झाले म्हणून पळ काढला…
राहुलचे लोकेशन पोलिसांना दिल्ली आणि नंतर कलकत्ता येथे आढळून आले आहे. त्याने दिल्लीतील एटीएममधून पैसे काढले होते. तर घरच्यांनी आणि मित्रांनी त्याला मेसेज आणि फोन केल्यावर त्याने एका मित्राबरोबर भांडणे झाली असून त्याच्यापासून वाचण्यासाठी पळत असल्याचे सांगितले. तेव्हा त्याचे लोकेशन कोलकाता येथे आढळले.ान पालिकेसमोर असणार आहे.