युट्यूबरचा मोठा खुलासा, सुशांत प्रकरणामागे अक्षय कुमार व आदित्य ठाकरेंचं नाव?

मुंबई- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आता चार महिने लोटली आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून पोलिसांकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.

अशातच आता सुशांत प्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठं नाव समोर आलं आहे. अभिनेता अक्षय कुमारवर सुशांत प्रकरणी एका युट्यूबरनं धक्कादायक आरोप केले आहेत. या युट्यूबरचं नाव रशीद सिद्दीकी असं असून, त्याला नुकतंच मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बिहारमधील राशिद सिद्दीकी हा सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात फेक स्टोरी आणि व्हिडीओ पोस्ट करणे, मानहानी, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणे असे काम करत होता. सध्या त्याच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रशीदने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, ‘सुशांतला एम.एस.धोनी सारखा मोठा चित्रपट मिळल्यानं अक्षय कुमार खुश नव्हता. अक्षय कुमारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि मुंबई पोलिसांसोबत गुप्त बैठक केली होती. याबरोबरच अक्षय कुमारने रिया चक्रवर्तीला कॅनडाला जाण्यासाठी मदत देखील केली होती’. असे आरोप रशीदमी केले आहेत.

दरम्यान, आता रशीदला अक्षय कुमारवर हे बिनबुडाचे आरोप करणं चांगलंच महागात पडलं आहे. अक्षय कुमारने रशीद सिद्दीकी विरुद्ध 500 कोटींचा मानहाणीचा दावा दाखल केला आहे. राशिदने बनावट कंटेट पब्लिश करून फक्त 4 महिन्यात 15 लाख रुपयांची भरभक्कम कमाई केली आहे. तसेच अक्षय कुमारने रशीदला नुकसान भरपाईची नोटीस देखील पाठवली असल्याचे सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.