मुंबई – भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेनिमित्त ‘तिला जगू द्या…’ हे गाणे पोस्ट केले आहे. हे गाणे सोशल मीडियावरही हे गाणे चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. या गाण्याला एक मिलियन्सपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, या गाण्याला लाईकपेक्षा डिस्लाइकच जास्त आहेत. तरीही या गाण्यासाठी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचे हे गाणे व्हायरल झाले आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा, अशा आशयाचे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल आहे. गाण्याचा आशय छान आहे.मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. माझ्या शुभेच्छा!!!https://t.co/m9Ygrg1K0z
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) November 19, 2020
दरम्यान, ‘तिला जगू द्या…’ हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी या गाण्यावरुन अमृता फडणवीस यांना ट्रोलही केले. मात्र, अमृता यांनी टीकाकारांचे आणि कौतुक करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
‘तिला जगू द्या… या गाण्याचं आपण कौतुक केलंत, त्यामुळेच त्याला गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूज मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, तसेच, माझं कौतुक करणाऱ्या आणि माझ्यावर टीका करणाऱ्या सर्वांचं मी आभार मानते. लवकरच, मी नवीन काहीतरी घेऊन आपल्या भेटीला येईल, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.