मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर खूपच ऍक्टिव्ह असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल 46 मिलियन फॉलोअर्स झाल्यामुळे चर्चेत होती. यातच ती पुन्हा एकदा चर्चेवर आली आहे.
जॅकलीनने दसऱ्याच्या निमित्ताने तिच्या स्टार मेंबरला एक खास गिफ्ट दिलं. जॅकलीने दिलेलं गिफ्ट मुळे पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. दसऱ्याचं निमित्त साधत जॅकलीनने तिच्या स्टाफ मेंबरला एक कार गिफ्ट केली आहे.
याशिवाय 46 मिलियन फॉलोअर्स तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत असून असंख्य लाइकस् मिळत आहेत. या फोटोंमध्ये जॅकलीन ही टॉपलेस असल्याचे दिसून येते. यात तिने आपल्या हातात फुलांचा एक गुलदस्ता घेतल्याचे दिसते. तिने फोटो पोस्ट करत चाहत्यांसाठी कॅप्शनमध्ये लिहिले की, “लव यू थॅंक्यू’ या फोटोमधील जॅकलीनचा बोल्ड लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जॅकलीन आगामी “भूत पुलीस’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. यात सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूर आदी कलाकार आहेत.
याशिवाय जॅकलीन “किक- 2’मध्ये सलमानसोबत काम करणार आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असली तरी अद्याप स्टारकास्ट निश्चित करण्यात आलेले नाही. या चित्रपटाकडून जॅकलीनला खूप अपेक्षा आहेत.