Big breaking news: अखेर सुशांतला ड्रग देणारा माफिया सापडला…

मुंबई – दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोला मोठे यश मिळाले आहे. सुशांतसिंह राजपूतला थेट ड्रग पुरविणारा माफिया एनसीबीच्या गळाला लागला आहे. सध्या गोव्यात एनसीबीची मोठी कारवाई सुरु असून यामध्ये काही ड्रग पेडलरना ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीने तीन जणांना अटक केली आहे, असे एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले. देशात गोव्याला अमली पदार्थांचे नंदनवन म्हणूनओळखले जाते. आणि याच गोव्यातून सुशांतला अंमली पदार्थ मिळत होते.

सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर दाखल केलेल्या खटल्यात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह 33 जणांवर शुक्रवारी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र 12 हजार पानांचे असून त्याला 50 हजार पानांचे परिशिष्ट जोडले आहे. त्यात आरोपींचे व्हॉट्‌स ऍप चॅट, कॉल डाटा रेकॉर्डस्‌, बॅंकांची कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांचा समावेश आहे. दोन ट्रंकमध्ये भरून आणलेल्या या आरोपपत्रात 200 साक्षिदारांचे जबाब आहेत. एनसीबीचे मुख्य समीर वानखेडे यांनी स्वतः विशेष न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर केले.

दरम्यान, याच्या प्रतींची खातरजमा केल्यानंतर त्या आरोपींना दिल्या जातील. अंमलबजावणी संचनालायाने पुरवलेल्या कागदपत्रांवर आधारीत पहिल्या खटल्यानंतर हा दुसरा खटला एनसीबीने दाखल केला आहे. राजपूत यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अंमलबजावणी संचनालयाने रिया आणि अन्य काही जणांची चौकशी केली होती. राजपुत याचा मृत्यू 14 जून 2020 ला त्याच्या निवासस्थानी आत्महत्या केल्याने झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.