अहमदाबाद – आयपीएल २०२४च्या आधी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. गुजरात यंदाच्या हंगामाची सुरुवात २४ मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्याने करणार आहे. परंतु तत्पूर्वी संघाचा यष्टीरक्षक खेळाडू रॉबिन मिन्झ जखमी झाला आहे.
रॉबिनला बाईक अपघातात दुखापत झाल्यामुळे तो संपूर्ण हंगामाला मुकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांनीही रॉबिन आगामी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची पुष्टी केली आहे.
रॉबिन मिन्झचे वडील फ्रान्सिस मिन्झ यांच्यानुसार, मिंज झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील कावासाकी कंपनीच्या सुपर बाईकवर चालवत होता आणि त्याचवेळी त्याचे बाइकवरील नियंत्रण सुटले. अत्यंत गंभीर दुखापतीचा बळी होण्यापासून त्याने स्वत:ला वाचवले असले, तरी त्याला क्रिकेट खेळता येणार नाही. रॉबिनला आयपीएल २०२४ च्या लिलावात गुजरात टायटन्सने ३.६० कोटी रुपयांना खरेदी केले होते.