मोठा गौप्यस्फोट! सचिन वाझेंनी पीपीई किट नव्हे …

मुंबई –  अंबानी यांच्या निवासस्थानाजवळून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्‍ती पीपीई किट घालून चालत आहे. ती व्यक्‍ती सचिन वाझेच असल्याचा संशय एनआयएला  होता. मात्र नुकत्याच वृत्त वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी पीपीई किट घातलेलं नव्हतं. एनआयएला तपासात मिळालेल्या माहितीनुसार, तो पीपीई किट नव्हता, तर तो पांढरा कुर्ता होता. याप्रकरणात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केल्यावर एनआयएच्या निदर्शनास ही बाब आली.

सचिन वाझे प्रकरणात क्राईम ब्रॅंचचीच झाडाझडती

दरम्यान, 49 सेकंदांच्या व्हिडिओद्वारे ओळख पटवली जाणार आहे. फॉरेन्सिक पोडियाट्रीचा वापर करून अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास केला जातो. यामध्ये एखाद्या व्यक्‍तीचे पाय, पायाचे ठसे, चालण्याची पद्धत याचे निरीक्षण केले जाते. इतकच नाही तर पायाचं मोजमाप, रचना यावरून आरोपीची ओळख पटवली जाऊ शकते. पाश्‍चात्य देशात अशा स्वरूपाची चाचणी घेऊन ओळख पटविण्यात येते, त्याच तंत्रज्ञानाचा वापर एनआयएकडून केला जाण्याची शक्‍यता मुंबई पोलीस दलातील सूत्रांकडून व्यक्‍त करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.