मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा म्हणजेच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. त्यांच्या मजेदार कॉमेंटस आणि त्यांनी शेअर केलेल्या अनेक फिल्मी किश्शांना भरपूर लाईक मिळत असतात. त्यांची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. यावेळी ते कोरोना मास्कमुळे चर्चेत आले आहेत.
नुकतंच बिग बींनी मास्कला हिंदी शब्द शोधून काढला आहे. मास्कचं त्यांनी केलेलं हिंदी भाषांतर ऐकून चाहते हैराण झाले आहेत. मास्कला हिंदीमध्ये काय म्हणतात? किंवा त्याचा हिंदी अनुवाद करायचा असेल तर कसा कराल? असा प्रश्न बिग बींनी चाहत्यांना विचारला होता.
T 3572 -After a lot of hard work by Ef Vb, he did the translation of ‘MASK’, in Hindi :
*”नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका ! 😂
nasikamukhsanrakshak keetaanurodhak vayuchanak vastrdoriyuktpattika pic.twitter.com/inTI84nQzw
— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 23, 2020
दरम्यान, त्यांच्या या प्रश्नावर कुणालाच उत्तर देता आले नाही. त्यानंतर अमिताभ यांनीच या प्रश्नाचं उत्तर दिलं. मास्कला हिंदी भाषेत ‘नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका’ असं म्हणता येईल, असे त्यांनी पोस्ट केलं.
हा अनुवाद वाचून नेटकरी चकित झाले आहेत. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.