मुंबई : मागील काही दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात रंगताना पाहायला मिळत होता. आता थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीने कारवाई केली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे.
Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut’s property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case, the agency said.
(File pic) pic.twitter.com/ocaQgh2Jnt
— ANI (@ANI) April 5, 2022
त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे. मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीने कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.
असत्यमेव जयते!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022
दरम्यान, ईडीने कारवाई केल्यानंतर लगेचच खासदार संजय राऊत यांनी ट्विटर वरून आपली परीतिक्रिया दिली आहे. त्यांनी या कारवाईवर फक्त सत्यमेव जयते हे दोनच
शब्द लिहिली आहे.