किन्नौर – हिमाचल प्रदेशात किन्नौर जिल्ह्यात हिमाचल राज्य परिवहन मंडळाच्या बसवर दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत ढिगाऱ्या खालून 12 जणांना बाहेर काढण्यात आले. अद्याप त्या ढिगाऱ्याखाली आणखी 30 जण अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे. वेगाने मदत कार्य सुरू करण्यात आले असून मोठी जीवीतहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, पंतप्र्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचलच्या मुख्यमंत्र्याशी संपर्क साधून या दुर्घटनेची माहिती घेतली. विभागीय आयुक्त अबीद हुसेन सादिक यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला या दूर्घटनेची माहिती दिली. इंडो तिबेटियन पोलिस दलाच्या पथकाने तातडीने मदतकार्यसुरू केले.
बचाव पथकाने ढिगाऱ्या खालून बाहेर काढलेल्या 12 जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. इंडो तिबेटीयन पोलिस दलाचे 300 जवान मदत कार्यात सहभअगी झअले आहेत.
दरडीच्या राड्यारोड्याखाली या बसशिवाय अन्य अनेक वाहने दबली गेली आहेत. ही बस रकॉंग पीओ या कन्नूरमधील गावातून सिमल्याकडे जात असताना ही दूर्घटना घडली.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटना समजताच हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या दुर्घटनेत लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिली. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला ताताडीने मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाला तातडीने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दरडीखाली बस आणि अन्य एक मोटार व ट्रक सापडली आहे.
गेल्या महिन्यात या जिल्ह्यात दरडीसोबात आलेल्या महाकाय दगड टेम्पो ट्रॅव्हलरवर पडून नऊ जण मरण पावले होते. त्यात आठ पर्यटकांचा समावेश होता. त्या एक नौदल अधिकारी, त्याची अमेरिका स्थित मैत्रिण आणि जयपूरमधील आयुर्वेदिक डॉक्टरचा समावेश होता.
Himachal Pradesh | A landslide occurred on the Reckong Peo-Shimla highway in Kinnaur district today
One truck and one HRTC bus reportedly came under the rubble. Many people reported trapped. Indo-Tibetan Border Police (ITBP) teams rushed for rescue: ITBP pic.twitter.com/GH4iAAsScX
— ANI (@ANI) August 11, 2021