चीनला रोखण्यासाठी बायडेन यांचा पुढाकार

नवी दिल्ली – चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या चार लोकशाही पहिली बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत इडो पॅसिफिक भागातील घडामोडींवर चर्चा होईल, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले. त्याबाबत अधिकचा तपशील न देता ते पत्रकारांना म्हणाले, शांतता, भरभराट आणि इंडो पॅसिफिक विभागातील स्थैर्य या मुद्‌द्‌यांवर चार देशांचे चार महत्वाचे नेते एकत्र येऊन काम करतील.

चीनशी मतभेद निर्माण झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या व्यापाराला फटका बसला आहे. त्याबाबत मॉरिसन म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्याशी मी अलीकडेच चर्चा केली आहे. प्रत्यक्ष भेट लवकरच होण्याची अपेक्षा आहे. या गटाच्या केंद्रस्थानी अमेरिका आहे. त्या भागातील आमच्या जोडीदाराची मते आम्ही जाणून घेणार आहोत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.