नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांच्या विरोधात आज दिल्लीतील विविध टॅक्सी संघटनांनी तीव्र निदर्शने केली. सकाळी 10 ते 11 या वेळेत टॅक्सी चालकांनी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निदर्शने केली. बाराखंबा रस्त्यावर आज ही निदर्शने करण्यात आली.
या ठिकाणी निदर्शने करण्यासाठी पोलिसांनी 80 जणांनाच अनुमती दिली होती पण त्यात उत्स्फुर्तपणे दोनशे टॅक्सी चालक सहभागी झाले होते. आम्ही आता या दरवाढीच्या विरोधात 22 आणि 23 मार्चच्या देशव्यापी निदर्शनांमध्येही सहभागी होणार आहोत असे सर्वोदय ड्रायव्हर असोशिएशनचे अध्यक्ष कमलजीत गिल यांनी नमूद केले.
अन्यही काही संघटनांनी दिल्लीत वेगवेगळ्या ठिकणी निदर्शने आयोजित केली होती. ऍप वर आधारीत टॅक्सी चालकांना सिटी टॅक्सीचे परमीट द्यावे अशीही या संघटनांची मागणी आहे.