मुंबई – सिने अभिनेत्री ‘भूमी पेडणेकर’ एक अशी अभिनेत्री आहे, जिने आपल्या दमदार अभिनयाच्या मदतीने आणि स्वतःच्या कर्तृत्वाने बॉलीवूडमध्ये स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले असून युवापिढीच्या मनावर अधिराज्य केले आहे. भूमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.
भूमी सध्या आपल्या आगामी ‘बढई दो..’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं नुकतीच भूमीने एक खास साडी डिझाईन करून घेतली आहे. विशेष म्हणजे या साडीवर ‘प्रेम’ हे दोन शब्द तिने स्वतः लिहून घेतले आहे. भूमीची ही साडी फॅशन डिझायनर संदिप खोसला यांनी तयार केली आहे.
View this post on Instagram
भूमीने साडीतील हे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पांढऱ्या रंगाच्या जाळीदार साडीवर छोटे छोटे डायमंड्स आहेत तर संपूर्ण साडीवर लाल रंगात प्रेम या दोन शब्दांना वेगेवेगळ्या भाषेत लिहिले गेले आहे. भूमीनं साडीवर स्लिव्हलेस ब्लाऊज घालणं पसंत केलं आहे. तिचे हे फोटो फॅन्सला प्रचंड आवडले असून, अनेकांनी तिच्या या लूकवर लाईक्स अँड कमेंटचा पाऊस पाडला आहे.
‘बधाई दो..’ या सिनेमात भूमी सोबत बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा सिनेमा आयुष्मान खुरानाच्या ‘बधाई हो’चा सिक्वेल आहे. त्याचीच हसवणूक या सिक्वेलमध्येही कायम राहणार असून, हा एक फॅमिली कॉमेडी ड्रामा सिनेमा असणार आहे.