Bhumi Pednekar: अभिनेत्री सई ताम्हणकर ‘भक्षक’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत काम केले आहे. भूमी पेडणेकरसह सईच्या अभिनयाचे देखील अनेकजण कौतुक करत आहेत. यातच सईच्या अभिनयाची भुरळ अभिनेत्री भूमी पेडणेकरला पडली आहे. भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर सईच्या कामाचे कौतुक करणार आहेत.
भूमीला तिच्या एका चाहत्याने सईसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? असे विचारले. त्यावर भूमीने, “मी सईच्या कामाची नेहमीच फॅन आहे.मी ‘हंटर’ पाहिल्यापासून आजपर्यंत तिच्या अभिनयाची चाहती आहे. जेव्हा पुलकितने सईसुद्धा भक्षकचा एक भाग असल्याचे सांगितले, तेव्हा मी सईसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक होती. तिचा या चित्रपटातला एक भाग माझ्या खूप जवळचा आहे. ती बालिकागृहात प्रवेश करतानाचा सीन सगळ्यांना भावुक करून जातो. अभिनयातील लालित्य आणि तिचे बोलके डोळे सगळं काही सांगून जातात आणि म्हणून ती एक उत्तम अभिनेत्री आहे.”
‘भक्षक’ चित्रपटात सई ‘जस्मीत गौर’ या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यात भूमी पेडणेकर, सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्यभूमिका आहेत. दरम्यान, सई मराठी सह हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिची पकड घट्ट करत आहे. यापूर्वी सई अभिनेत्री क्रीती सेनॉनसोबत ‘मिमी’ सिनेमात दिसली होती. सरोगसी या विषयावर आधारीत या सिनेमात शमा आणि मिमी या दोन मैत्रिणींमधील बाँडिग दाखवण्यात आले होते.