Supriya Sule on Sunetra Pawar। आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात फिरताना दिसून आहे. त्यातच प्रत्येक मतदारसंघात अटीतटीची लढाई होणार असल्याचे पाहायला मिळतंय. त्यातच सर्वात जास्त चर्चा होतीय ती म्हणजे बारामती लोकसभा मतरदारसंघाची. याठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झालंय. त्यावरूनच आता सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केलीय.
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यांनी यावेळी ‘ मी मतं मागते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर बोचरी टीका केली. एवढंच नाही तर ‘मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं..असं कॉपी करून पास नाही होणार, मैे सुप्रिया सुळे हूं..खुद करुंगी और खुद पास हुंगी’ अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांना टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच बिघडले आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संघर्ष वाढताना दिसतोय. काही दिवसांपासून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातही गेल्या काही दिवसांपासून खडाजंगी होताना दिसतीय. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे संपूर्ण बारामती मतदार संघ पिंजून काढत आहेत.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ? Supriya Sule on Sunetra Pawar।
“मी आता जी मतं मागते ती मेरिटवर मागते. मतं मागायला मी जाते, सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही’ अशा शब्दांत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करणाऱ्या अजित पवारांवर निशाणा साधला. लोकसभा निवडणूक लढायच्या दोन वर्ष आधीपासून मी मतदार संघांचे दौरे करत होते. दोन वर्षात मी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढलाय. मी लोकप्रतिनिधी आहे, नवऱ्याने पेपर भरायचा आणि मी पास व्हायचं..असं कॉपी करून पास नाही होणार, मैं सुप्रिया सुळे हू..खुद करुंगी और खुद पास हुंगी.. असा खोचक टोलाही त्यांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना उद्देशून लगावला.