पिंपरी, (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवभक्त मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या सेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शिवभक्तांच्या सोयीसाठी शनिवार (दि. १७) ते सोमवार (दि. १९) या कालावधीत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तीन दिवसांच्या या कालावधी भोसरी ते जुन्नर या मार्गावर बस धावणार असून भोसरी येथून सकाळी ५.३०,७, ८.३०, १०, १.३०, ३, ४.३० व सायंकाळी ६ या वेळेत बस सुटेल. शेवटची बस ही सायंकाळी ६ वाजता भोसरी येथून सुटणार आहे.
जुन्नरहून भोसरीसाठी बस सकाळी ९.३०, ११, १२.३०, २, ५.३०, ७, ८.३० व १० वाजता बस सुटणार आहे. शेवटची बस ही रात्री १० वाजता सुटणार आहे. बससेवेचा लाभ शिवभक्तांनी व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.