इंद्रायणीनगर, (वार्ताहर) – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 128 व्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचा जागर घालत भोसरीतील विदर्भ माळी युवा संघातर्फे संत सावतामाळी मंदिराच्या प्रांगणात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे माजी अध्यक्ष मोहन राऊत, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास गिर्हे, गणेश वानखडे, संदीप राऊत, विनोद देवकर उपस्थित होते. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष वसंत अत्तरकार, मोहन भड, गोपाल बोचरे, उखा तायडे, रवींद्र जुमळे, प्रवीण चोपडे, नारायण जुमळे, अनिल जुमळे, विजय अढाऊ, नितीन वरुडकर, संतोष येनकर, गणेश बगाडे, योगेश बगाडे, नितीन निमकर्डे, गजानन बोदडे, गणेश बोंबटकार यांनी अथक परिश्रम घेतले.