पिंपरी, (प्रतिनिधी) – एका ज्येष्ठ नागरिकाच्या मित्राच्या नावाने बनावट फेसबुक खाते बनवून 94 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना मंगळवार (दि. 13) ते बुधवार पर्यंत (दि. 14) काळेवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी महेंद्र चिंधु धिवरे (वय 58, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून 8249989484 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या मित्राच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार त्यावरून फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला.
धिवरे यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना घराचे सामान विकायचे आहे, असे सांगून फिर्यादी यांना सामान पाठवण्यासाठी म्हणून फिर्यादी व त्यांच्या मुलाने आरोपीला 94 हजार 500 रुपये पाठविले. मात्र चौकशी अंती हे बनावट खाते असल्याचे लक्षात आले.