राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या 15 वा वित्त आयोग निधी आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंजूर विविध बंदिस्त गटर आणि सांडपाणी व्यवस्थापन कामांचे नुकतेच लोकनियुक्त सरपंच ऋतिका सातकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सातकरस्थळ उपसरपंच मयूर जगदाळे, सदस्य अजय चव्हाण, निलेश अरबुज, प्रमोद सुपे, नयना काळे, अमिता सातकर, स्वाती सातकर, जयश्री पडवळ, वर्षा देवरे, ग्रामसेवक निलेश पांडे, माजी सरपंच मारुती सातकर, साहेबराब सातकर, मितेश थिगळे, आकाश सातकर, अभिजित सातकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.