पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सादर केलेल्या ‘पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ’ संकल्पनेला असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) च्या वार्षिक परिषदेत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर व मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी केंद्रीय रस्ते आणि राजमार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
पुणे शहरातील आर्किटेक्ट व सर्ग स्टुडिओचे संचालक योगेश दांडेकर यांच्या कल्पनेतून त्यांनी पीएमपीच्या वाहतूक नियोजन विभागाकडे पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ ही संकल्पना सादर केली होती.
या योजनेअंतर्गत वाहतूक नियोजन अधिकारी (आयटी) विजय रांजणे यांनी बस मार्गांचे नकाशे, जंक्शन नकाशा, बस थांब्यावरील वारंवारितेचे वेळापत्रक, बस कनेक्टिव्हिटी मॅप प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी मुख्य बस स्थानकावर लावण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.