पुणे – जिल्ह्यातील धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे खडकवासला धरण भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून 13000 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानं पुणे शहरातील डेक्कन येथील भिडे पूल पाण्याखाली गेलाय. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
खडकवासला धरणातून 10 हजार क्यूसेक पेक्षा अधिक पाणी सोडण्यात आल्यानंतर या पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. गेल्या काही दिवसात सततच्या पावसामुळे खडकवासला धरण भरले आहे. त्यामुळे टप्याटप्याने धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासात खडकवासला धरणात 32, पनशेत 147, वरसगाव 133 तर टेमघर धरणात 142 मिमी पाऊस झाला असून पानशेत धरण 83 टक्के भरले आहे.